वीज दरवाढ विरोधात चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने भव्य मोर्चा
वीज दरवाढ विरोधात आज बेळगाव चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज येथून मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सरकारने जी भरमसाठ वीज बिलात दरवाढ केली आहे त्याचा निषेध करण्याकरिता आज बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.
तसेच या विराट मोर्चा मध्ये इलेक्ट्रिक दुचाकीची अंत्ययात्रा काढून वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी सर्वांनी केली. यामध्ये उद्योजक व्यापारी कामगार सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी मोर्चामध्ये आम्हाला न्यायदा वीज दरवाढ मागे घ्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले असता जिल्हाधिकारी अनुपस्थित होते त्यामुळे सर्वांनीच आक्रमक पवित्र घेतला आणि रस्त्यावर ठाण मांडण्याचा निश्चय केला मात्र थोड्यावेळाने जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील हजेरी लावत निवेदनाचा स्वीकार केला आणि यावर योग्य उपाययोजना करू अशी ग्वाही दिली.
तसेच याप्रसंगी अनेकांनी आपले मग जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. भरमसाठ होणारी वीज दरवाढ ही मागे घेण्यात यावी असा आक्रमक पवित्रा सर्वांनी घेतला जर यावर विचार केला गेला नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन छेडू असा इशारा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने देण्यात आला.