बेळगाव: नव्याने उदयाला आलेल्या बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन आणि स्पोर्ट्स या संघटनेचा उद्घाटन समारंभ गोवावेस येथील संत तुकाराम महाराज संस्कृती भवन बेळगाव येथे उदयाला थाटात संपन्न झाला.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून शरीरसौष्ठव असोसिएशन आणि स्पोर्ट्स या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी युवा उद्योजक व युवा नेते आर.एम.चौगुले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या संघटनेच्या माध्यमातून दुर्लक्षित शरीरसौष्ठवपटूंना एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे. काही वर्षापूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवलेले. माजी शरीरसौष्ठवपटू या ठिकाणी उपस्थित असल्याने मला आनंद झाला आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून शरीरसौष्ठव पटूंना मोठी झेप घेण्यास पोषक वातावरण नक्कीच निर्माण होईल. मध्यंतरी काळामध्ये संघटनेतर्फे स्पर्धा बंद पाडल्याने स्थानिक खेळाडूंची मोठे नुकसान झाले.आता पुन्हा ही संघटना सक्रिय झाल्याने सर्व स्पर्धकांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहेत.
याप्रसंगी बेळगाव मर्चंट सोसायटीचे चेअरमन नारायण केतवाडकर, माजी नगरसेवक किरण परब, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, महेश कुदळे, किशोर गवस, प्रणय शेट्टी, मराठा जागृती संघाचे गोपाळ बिर्जे, माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्यासहित आजी-माजी शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.
तसेच बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन आणि स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते, उपाध्यक्ष सुनील चौधरी व बाबू पावशे खजिनदार नारायण चौगुले सरचिटणीस राजेश लोहार, सहसचिव अमित जडे व जितेंद्र काकतीकर, संयोजक सचिव अनिल आंबरोळे, भारत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, प्रेमकांत पाटील, चेतन तशिलदार, विजय चौगुले, विनोद मैत्री, एडवोकेट सिद्धार्थ राजे सावंत उपस्थित होते.