या ठिकाणी प्रथमोपचार कार्यशाळेचे करण्यात आले होते आयोजन
केएलई सेन्टीनर चर्टेबल हॉस्पिटल अँड एमआरसी येळळूर आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सयुक्त विद्यमानणे प्रथमोपचार कार्यशाळा येळळूर बेळगाव येथे पार पडली.
जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी डिपार्टमेंट ऑफ पीडीअट्रिक्स् – केएलई सेन्टीनर चर्टेबल हॉस्पिटल अँड एमआरसी येळळूर आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सयुक्त विद्यमानणे आज प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा डॉ. येस. सी. धारवाड (Director of Kle) आणि डॉ. कडडी (HOD Peadiatrics) यांच्या सहयोग आणि मार्गदर्शनाने पार पडली.
शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती (Basic Life Support), सी पी आर ची प्रणाली या विषयांवर तज्ञांनी पॉवर पॉइट प्रेझेंटेशन द्वारा मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छातीदाबन आणि ब्रेथिंग फॉर पेशंट वर सखोल मार्गदर्शन करून रबरी मानवी पुतळ्यावर प्रत्येक्षिके घेण्यात आली. त्यामुळे छतीदाबन कसे करायचे हे स्पष्ट झाले. चित्रे आणि व्हिडिओ दाखवून चोकिंग आणि त्यावर प्रथमोपचार हा विषयपण सुस्पष्ट करण्यात आला. कार्यशाळेचा 40 हून अधिक कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.
डॉ. जोत्यी दाभोळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेचा हेतु डॉ. नम्रता कुट्रे यांनी स्पष्ट केला तर प्रथमोपचार प्रशिक्षणाची आवशकता याविषयावर श्री हृषीकेश गुर्जर बेळगाव समन्वयक हिंदू जनजागृती समिती यांनी विचार मांडले. डॉ. श्रीनिवास यस. (हेड ऑफ मेडीसीन डिपार्टमेंट) आणि डॉ. संतोष करवशी (प्रोफेसर ऑफ पीडीअट्रिक्स् डिपार्टमेंट), यांनी उपरोक्त विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. बसवराज, डॉ. अनिता आणि सीमा यांनी सर्वांकडून प्रात्येक्षिके व सराव करून घेतला. संपूर्ण कार्यशाळेत कार्यकर्त्यांचा उत्साह चांगला होता.