सायकल प्रवासातून तब्बल 2300 किलोमीटरचा अंतर केला पार
बेळगाव मधील धारकर यांचा बेळगाव ते श्री केदारनाथ सायकल प्रवास संपन्न बेळगाव मधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे धारकरी मुतगा आणि बाळेकुंद्री येथील धारकरी ऋतिक रमेश पाटील व धारकरी पवन बाबुराव पाटील या दोघांनी तब्बल 2300 किलोमीटरचा अंतर सायकल प्रवासातून पार केला दिनांक 18 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता त्यांनी बेळगाव मधून या प्रवासाला सुरुवात केली.
तब्बल 18 दिवसांच्या या खडतर प्रवासातून मार्ग काढत महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश मार्गे उत्तराखंड येथे केदारनाथ श्री केदारनाथ चे दर्शन त्यांनी घेतले वाटेत असणारी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. परतीचा प्रवासात मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या निमित्ताने त्यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले अनेक धारकरी बंधन च्या वतीने त्यांना हार घालण्यात आला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथपर्यंत छोटीशी बाईक रॅली कडून त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून दोघा धारकऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रांत प्रमुख श्री किरण बापू गावडे तसेच बेळगाव जिल्हाप्रमुख श्री विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते त्या दोघा धारकऱ्यांचा समस्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परिवार तसेच बेळगावकर शिवभक्तांच्या वतीने फेटा बांधून, शाल, श्रीफळ तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी धारकरी बोलत असताना आपली भावना व्यक्त केली. हे राष्ट्र लवकरात लवकर हिंदू राष्ट्र व्हावे, तसेच आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दुर्गराज रायगड वरती ३२ पण सुवर्ण सिंहासनाची पुनर्नस्थापना करण्यासाठी जो संकल्प लाखो धारकांच्या समवेत सोडलेला आहे, तो संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि दुर्गराज रायगडावरती छत्रपती शिवरायांचा 32 मन सोन्याचा सिंहासन निर्माण व्हावं आणि येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन देव,देश,धर्मासाठीची कार्य करण्याची ऊर्जा मिळण्यासाठी त्या सुवर्ण सिंहासनाचे दर्शन घेण्यास रायगडावरती यावं याच साकडं घालण्यासाठी बेळगाव ते श्री केदारनाथ असा 2300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकल वरून केला अशी त्यांनी भावना व्यक्त केली.
यावेळी तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील,विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, गजानन निलजकर, अंकुश केसरकर, प्रवीण मुरारी,प्रमोद चौगुले, प्रफुल शिरवळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, किरण बडवानाचे, राजू पोटे, अतुल केसरकर, शुभम मोरे, संकेत सुतार,आदर्श चौगुले, राहूल बेळगावकर, जोतिबा नागेनट्टी, चेतन चिनवाल, बसवराज तासीलदार, विशाल उत्तम पाटील, गोपाळ चौगुले, दर्शन जाधव, अभिजित जाधव, विक्रम नागेनाट्टी, परशाराम इरोशी,रमेश पाटील, नारायण पाटील, अक्षय नीलजकर,मोहन जोई,पिराजी मोदगेकर तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते.