के.एल.एस. श्री वसंतराव पोतदार पाॅलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस सुरेश पाटील ( चापगांव ता.खानापूर) याने सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तम गुणवत्तेत पास झालेला आहे.
राज्यात तांत्रिक शिक्षण विभागाच्या तांत्रिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या यंदाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या सहाव्या सेमीस्टर अंतिम परीक्षेमध्ये तेजस सुरेश पाटील यांने 96.5 टक्के गुण संपादन करून तो सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत महाविद्यालयातून प्रथम आलेला आहे.
तेजस हा संजय इलेक्ट्रीकल्स खानापूरचे प्रोप. श्री कृष्णाजी पाटील यांचा नातू व श्री संजय कृ. पाटील यांचा पुतण्या, तर बिल्डिंग काॅन्टॅक्टर श्री सुरेश कृष्णाजी पाटील व सहशिक्षिका सौ.प्रतिभा सुरेश पाटील (चन्नमानगर, बेळगांव) यांचा जेष्ठ चिरंजीव आहे.
त्याला महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. एस.मलाज, विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मी अंगडी, प्रा. प्रमोद तेरदाळकर, प्रा. प्रदीप कुलकर्णी, प्रा. स्वाती जोशी, प्रा. स्वरुपा, प्रा. सीमा आणि आई-वडीलांचे मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.