कार थेट विजेच्या खांबावर
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट विजेच्या खांब्याला धडकल्याची घटना धारवाड येथील एचडीएम रुग्णालय समोर घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की काल रात्री उशिरा भरधाव वेगात असलेल्या कारभारील चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे का रस्त्यालगच्या फुटपाथ वरून विजेच्या खांबाला आदळली.
या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवाशांची ओळख पटू नये याकरिता कार वरील दोन्ही नंबर प्लेट काढून टाकण्यात आले आहेत. तसेच याबाबत धारवाड येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.