महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक शनिवार १५ रोजी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीत येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दु . ३.०० वाजता मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे “मराठी भाषा गौरव दिन सोहळा” नुकत्याच संपन्न झालेल्या “भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा” कै.श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा” आणि मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये “बेळगाव शहर” “बेळगाव ग्रामीण” आणि “खानापूर तालुका” यामध्ये उत्तीर्ण झालेल्या अव्वल तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री आकाश चौगुले (IRS, अप्पर आयुक्त जी.एस.टी. बेळगाव)
हे लाभणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त हे येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजी बेळगावला येणार आहेत असे पत्र पाठविले असून त्यांची भेट घेऊन सीमाभागातील कन्नड सक्ती निदर्शनास आणून देण्याचा तसेच सीमाभागामध्ये मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत व्यवहार मिळावा यासाठी निवेदन देण्याचे निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीला उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, खजिनदार विनायक कावळे, आनंद धामणेकर, संतोष कृष्णाचे, विशाल गौंडाडकर, महेश जाधव, अश्वजीत चौधरी ,प्रतीक पाटील, प्रतीक चौगुले, आकाश भेकणे उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार मानले.