*_शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे पोरवाल परिवाराकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप_*
येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे सोमवार (ता.26) रोजी स्वर्गीय कमलाबाई हिराचंदानी असलाजी पोरवाल आणि स्वर्गीय लिंकित किरण पोरवाल यांच्या स्मरणार्थ श्री. किरण हिराचंद पोरवाल आणि संजय हिराचंद पोरवाल यांच्याकडून आज मराठी शाळा क्रमांक 5 येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दीपक किल्लेकर होते.
यावेळी पोरवाल परिवारातर्फे बोलताना श्री संजय पोरवाल म्हणाले की,
” आमच्या आई पासून प्रेरणा घेऊन आम्ही दरवर्षी गरजू मुलांना उपयोगी वस्तू पुरवून शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपतो . याद्वारे मिळणारे मानसिक समाधान खूप वेगळे असते”.
माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्री रवी नाईक यांनी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून पोरवाल कुटुंबीयाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात दीपक किल्लेकर यांनी सर्व देणगीदारांचे कौतुक केले, इयत्ता पहिली ते आठवी च्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या वह्यांची मदत आज त्यांच्याकडून झाली त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले व असे दाते आणखी निर्माण व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
मुख्याध्यापक मुचंडीकर सर यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून पोरवाल परिवाराच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला, तसेच इथून पुढेही अशीच भरघोस मदत शाळेच्या मुलांना त्यांच्याकडून मिळत राहूदे ही सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे रवी नाईक, श्रीकांत कडोलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व्ही व्ही पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पी ए माळी तर आभार एच व्ही नाथबुवा यांनी केले..