बेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
बेळगावच्या उद्योजकांनी बंगलोर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मा ई यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या बाबतीत चर्चा केली.आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी ही भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या साठी सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री बी. ए.बसवराज देखील उपस्थित होते.बेळगावात टेक पार्क स्थापन करण्यात येईल फौंडी आणि हैदरो ड्रॉ लिंक उद्योगासाठी प्रत्येकी पाचशे एकर औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल.ऑटोमोबाईल उद्योगही बेळगावात आणण्यात येतील .बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात बेळगावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी दोन तास वेळ देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले.