आयुष्यमान कार्ड धारकांना बीम्स इस्पितळातील सर्व उपचार मोफत
ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड आहे त्या व्यक्तींना बीम्स इस्पितळातील सर्व उपचार मोफत देण्यात येत असल्याची माहिती यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की आयुष्यमान भारत कार्ड असलेल्या रुग्णांना एक्स-रे एमआरआय सिटीस्कॅन मोफत करण्यात येणार आहे.
तसेच ही सुविधा 24*7 उपलब्ध असणार आहे.
तसेच ज्या व्यक्तींकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही अशा व्यक्तींना 50% सूट बीम्स इस्पितळात देत असल्याचे याप्रसंगी सांगितले.
त्याचबरोबर जे रुग्ण बिम्समध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत त्यांना सर्व सुविधा मोफत असणार आहेत मात्र जे रुग्ण या ठिकाणी उपचाराकरिता दाखल नसतील मात्र त्यांना कोणत्याही स्कॅन ची गरज असल्यास त्यांना 50% सूट मिळणार आहे.
तसेच बीपीएल कार्ड असलेल्यांना या सुविधा मोफत असणार आहेत त्यामुळे बीम्स मध्ये या लागू करण्यात आलेल्या तीन योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा अशी विनंती उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.