महाभयंकर लिम्पिस्किन रोगाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
बेळगाव:शहरासह अनेक गावांमध्ये जनावरांना अनेक रोग जडत आहे त्यात आता महाभयंकर लिम्पिस्किन हा रोग जडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांना जनजागृती करिता तसेच शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी व कोणता उपाय योजना राखाव्यात त्याचबरोबर स्वच्छता कशाप्रकारे ठेवावे याबद्दल जनजागृती करिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदर बैठक बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष व मराठा नेते विनय विलास कदम तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप हन्नूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत आंबेवाडी येथे संपन्न झाले.
यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी या वायरल इन्फेक्शन बद्दल माहिती दिली तसेच आपल्या जनावरांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्याशी संपर्क साधावा अशी सूचना याप्रसंगी केली.
यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन जनरल सेक्रेटरी राहुल भातकांडे, आंबेवाडी गावातील भाजप कार्यकर्ते खाचु तरळे ,प्रमोद तरळे, डॉ सचिन तरळे, अरुण सांब्रेकर, विकास भातकांडे ,प्रेम तरळे, दयानंद होनगेकर, मंजुनाथ कांबळे, सचिन शहापुरकर, नंदू तरळे ,राजू सांब्रेकर, शंकर सांब्रेकर ,उमेश चौगुले, दिनेश बोगार ,संतोष लोहार ,विक्रम यलगुकर ,लक्ष्मण चौगुले व श्री राम युवक मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते.