जीतो तर्फे भव्य रक्तदान शिबीर
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगाव समूहाच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिनी बेळगाव औषध नियंत्रण विभाग आणि इतर स्वयंसेवी संस्था, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
15 ऑगस्ट 2022 रोजी महावीर भवन, हिंदवाडी, बेळगाव येथे सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 वा. सदर रक्तदान शिबीर पार पडणार आहे .तरी सर्वानी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .