दंत/तोंडाच्या आजारांपासून बचाव करण्याबाबत जागरूकता दिवस साजरा
बेळगाव:इंडियन सोसायटी ऑफ पीरियडॉन्टोलॉजीचे प्रमुख डॉ. जी.बी. शंकवलकर यांचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला होता आणि त्यांच्या जयंतीनिमित्त ओरल हायजीन डे दरवर्षी देशभरात दंत/तोंडाच्या आजारांपासून बचाव करण्याबाबत जागरूकता आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्यानिमित्त येथील पीरियडॉन्टोलॉजी विभाग, मराठा मंडळाचे नाथाजीराव जी हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बेळगाव, एनएसएस युनिट आणि इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव शाखेच्या वतीने रेल्वे स्टेशन बेळगाव आणि मध्यवर्ती बसस्थानकावर पथनाट्य सादर केले .
यावेळी पथनाट्याचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती करणे आणि गैरसमज मोडून काढणे हा होता. यावेळी आयडीएचे अध्यक्ष डॉ सचिन शिवनाईकर, पीरियडॉन्टोलॉजी विभागाच्या एचओडी डॉ आरती नायक, डॉ पुष्पा, डॉ संदीप कट्टी, डॉ संजीवनी हत्तर्की, डॉ सचिता नाईक, डॉ आकांक्षा भट्ट, डॉ सत्य कुराडा, एनजीआयडीएस मराठा मंडळांचे विद्यार्थी उपस्थित होते.
पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ.राजेश पटनायक यांनी केले.मराठा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू, प्राचार्य डॉ. रमाकांत नायक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संघाचे अभिनंदन केले