भंडार शहा मोहल्ला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
बेळगाव:सहारा फाउंडेशन एनजीओ यांच्या सहकार्याने भंडार शहा मोहल्ला मुस्लिम जमात आणि यंग कमिटी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच डेंग्यू प्रतिबंधात्मक डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदर शिबिर येथील भंडार शहा मोहल्ला बेळगाव येथे रविवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडला. यावेळी डॉक्टरांनी नागरिकांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत गोळ्यांचे वितरण केले.
या शिबिरात डेंग्यू ड्रॉप्स रक्तदाब मधुमेह आरोग्य नेत्र तपासणी यासह अनेक आरोग्यविषयक चाचण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी युवक युवतींसह महिला आणि पुरुषांनी देखील या आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिराचा लाभ घेतला.
अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यात डेंगू चिकनगुनिया मलेरिया यासारखे आजार फैलावत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉक्टर मास लखाने यांनी सांगितले.
यावेळी जवळपास 60 ते 70 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उज्वल नगर गांधीनगर अहमदनगर या भागातील नागरिकांना मोफत औषधे तसेच कॅल्शियम गोळ्यांचे वितरण देखील करण्यात आले.