40 जण दूषित पाणी पिल्यामुळे अस्वस्थ
बेळगाव :जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील बेन्नुर गावातील चाळीस जण दूषित पाणी पिल्यामुळे अस्वस्थ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
होस्केरी ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बेन्नुर गावातील चाळीस जणांना दूषित पाणी पिल्यामुळे उलट्या होण्यास प्रारंभ झाला.चाळीस पैकी तेरा जण अत्यवस्थ आहेत.त्यांना राम दुर्ग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .सरकारी पाणी योजनेच्या नव्या पाईप लाईन मध्ये दूषित पाणी मिसळत असल्यामुळे ग्रामस्थ दूषित पाणी पिऊन अस्वस्थ झाले आहेत.पाईप लाईनचा व्हॉल्व तुटून त्यात गटारीचे पाणी मिसळले गेले आणि त्यामुळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचे ध्यानात आले आहे .राम दुर्ग तहसीलदारांनी गावाला भेट देवून ग्रामस्थांची भेट घेवून समस्या जाणून घेतली आहे .खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य सेविका घरोघरी जाऊन गोळ्यांचे वितरण करत आहेत.