महिला आघाडीतर्फे चिकनगुनिया, डेंग्यू प्रतिबंधक डोस
सध्याच्या पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे आज सोमवारी जनतेला मोफत चिकन गुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक औषधाचा डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात डासांची पैदास वाढवून चिकनगुनिया आणि डेंग्यू रोगाची लागण होण्याचा धोका असतो. सध्या शहर परिसरात हा धोका वाढला असल्याचे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सदर रोगप्रतिबंधक औषधाची डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील गणपत गल्ली व मार्केट परिसरात ठिकठिकाणी थांबून स्वतः रेणू किल्लेकर व महिला आघाडीच्या अन्य पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ये -जा करणारे नागरिक, महिला, युवक, युवती अशा सर्वांना चिकनगुनिया व डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे डोस पाजले.
सदर उपक्रमात प्रिया कुडची, मंजुषा कोलेकर, अर्चना देसाई, कांचन भातकांडे, भाग्यश्री जाधव, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, कांचन येळ्ळूकर, सुजाता बामुचे रेखा, गोजगेकर, आशा सुपली आदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.