मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
बेळगाव:राणी सईबाई महिला शक्ती आयोजित गोंधळ गल्ली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह रक्तदाब नेत्र तपासणी करण्यात आली. याबरोबरच डेंग्यू आणि चिकनगुनियाचे डोस देखील देण्यात आले.
गोंधळी गल्ली येथील वेताळ मंदिरमध्ये काल रविवारी सदर शिबिर राबविण्यात आले. यावेळी या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 180 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच जवळपास 800 हून अधिक नागरिकांना डेंग्यू चे ड्रॉप्स घालण्यात आले
याप्रसंगी फक्त गल्लीतील नागरिकांनी नाहीतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता सईबाई महिला शक्तीच्या कार्यकर्त्या अमृता कारेकर माधुरी रांगणेकर शशिकला सुरेकर रेणुका रसाळकर अर्चना कंग्राळकर राजश्री पायांनावर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच बीजेपी युवा मोर्चाचे सेक्रेटरी सौरभ सावंत अनिकेत धर्मदासनी विवेक महांशेट्टी भुजंग निलजकर यांनीही मोलाची मदत केली.