मराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही
आज दिनांक १ ९ जुलै २०२२ रोजी बेंगळुर येथील पॅलेस ग्राऊंड मध्ये मराठा समाज विकास महामंडळ ( प्राधिकार ) यांचा उद्घाटन सोहळा व ओरिएंटेशन कार्यक्रम भव्य स्वरुपात पार पाडला . या संदर्भात कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माई , निकटपुर्व मुख्यमंत्री श्री येडीयुरप्पा जी , कर्नाटक सरकारच्या मंत्रीमंडळातील अनेक सदस्य व आमदार गण तसेच काँग्रेस व इतर पक्षाचे मराठा समाजातील अनेक आमदार यांनी या कार्यक्रमात हाजेरी लावली होती . दीपप्रज्वलन करून शिवरायांना पुष्पार्चन करुन नाडगीतेबरोबर कार्यक्रमाला प्रारंभ झाला . तदनंतर मराठा प्राधिकाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ . एम . जी . मुळे यांनी प्रास्ताविक भाषण करुन मराठा समाजासमोर असलेल्या अनेक अडीअडचीं व मागण्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या . आपल्या वक्तव्यात ते पुढे म्हणाले की , कर्नाटकात बऱ्याच ठिकाणी राजर्षी शहाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्षानुवर्षे वास्तव होता . तरीसुद्धा त्यांनी ओळख किंव्हा आठवणी म्हणुन ते ज्या ज्या ठिकाणी वसले अशा जागांचा व अशा स्थळांना त्या ठिकाणी त्यांच्या मुर्त्या म्हणा किंव्हा आणखी काही म्हणा स्थापले गेले नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना फाऊंडर ऑफ नेवी असे संबोधले जाते अशा स्थळी त्यांचे स्मारक बांधावे अशी मागणी केली तसेच मराठा समाज हा लढवय्या समाज म्हणुन संपुर्ण जगात ओळखला जातो त्यासाठी कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सैन्य प्रशिक्षण केंद्र चालु करावे अशीही मागणी केली . या संदर्भात निकटपुर्व मुख्यमंत्री श्री येडीयुरप्पा जी यांनी आपल्या कारकिर्दीत हे मराठा प्राधिकार कसे स्थापण झाले व त्यासाठी मी ५० कोटींची तरतुद केली याची आठवण करून दिली . मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्माई यांनी आपल्या भाषणात आता असलेल्या १०० कोटी बरोबर आणखीन १०० कोटीची मंजुरी व त्याबरोबर ज्या आरक्षणाची मागणी IIIB पासून IIA करा असे मराठा समाज करत आहे त्याचीसुद्धा लवकरात लवकर घोषणा करेन अशी ग्वाही दिली . या संदर्भात बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार श्री अनिल बेनके , श्री अभय पाटील व हजारो संख्येने बेळगांवचे मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते . या सर्व कार्यक्रमात हजारो संख्येने आलेल्या मराठा समाजातील जनतेची तंतोतंत काळजी घेतली व कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी मराठा प्राधिकार व कर्नाटक सरकारचे धन्यवाद व्यक्त केले .