गायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी
मध्यरात्री गोवा मार्गे गायींची कत्तलीसाठी अवैध तस्करी करण्यात येत आहे. याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या प्रकारावर वेळीच आळा घालावा आणि ही चालू असलेली गायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी खानापूर भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी निवेदनाद्वारे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनाचा स्वीकार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला असून या प्रकरणावर लक्ष घालून अवैध प्रमाणे होणारी गायींची तस्करी थांबविली जाईल अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी पंडित ओगले यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट देऊन सदर निवेदन सादर केले. यावेळी किरण तुडेकर अभिजीत चांदीलकर अमीर दोडमनी ज्ञानेश्वर दौलतकर उपस्थित होते.