के एल ई संस्थेच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्य आणि संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवून अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीने के एल ई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणारे डॉ.प्रभाकर कोरे हे पहिले भारतीय आहेत.थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात युनिव्हर्सिटीचे सी ई ओ आणि इंटरिम प्रेसिडेंट एच.रिचर्ड हॅवरस्टिक ज्युनियर यांच्या हस्ते कोरे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली.यावेळी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू आणि मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.के एल ई संस्थेच्या २८२ शाळा,कॉलेज असून त्यामध्ये १३८००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शिक्षण आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्या पर्यंत पोचविण्याचे कार्य के एल ई संस्थेने केले आहे.प्रसूती आणि बालकांच्या विविध समस्या यावर संस्थेच्या हॉस्पिटलमधे संशोधन सुरू असून त्या संशोधनाचा उपयोग महिला आणि बालकांना झाला आहे.याशिवाय इंजिनियरिंग कॉलेज,मेडिकल कॉलेजमध्ये देखील विविध विषयावर संशोधन सुरू असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे