डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना अमेरिकेतील एका प्रतिष्ठित इंडो अमेरिकन प्रेस क्लबने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
सदर कार्यक्रम न्यूयॉर्क येथे शनिवारी दिमाखात आणि उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमात केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवड असे माजी महापौर बिल दे ग्लासीसो, झेवियर विद्यापीठाचे अध्यक्ष रविशंकर भोपाळ कर प्रसिद्ध कर्करोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय नोरी, भारतीय उद्योजक व न्यूयॉर्क शहर शहर आर्थिक विकास मंडळाचे सदस्य प्याम क्वात्रा इंडो अमेरिकन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष कमलेश मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर कोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात आणि विशेष करून ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा समाज आणि राष्ट्र निर्माण कार्यात डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.