भाजपमध्ये फूट पडत असल्याने याला थारा देण्याकरिता भाजपने सध्या कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यात ठिक ठिकाणी बैठका आणि पत्रकार परिषद घेऊन या गटाच्या राजकारणाला ब्रेक लावण्यात येत आहे. मात्र याला देखील काही आणि आमदार अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अद्यापही भाजप मध्ये गटातटाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील आज बैठक बोलाविण्यात आली होती मात्र या बैठकीला भाजपचा चार आमदारांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. सदर बैठक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. यावर या बैठकीत अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी होते.
सदर बैठक येथील एका खाजगी हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी या बैठकीला भाजपचे अभय पाटील रमेश जारकीहोळी पी राजीव आणि दुर्योधन ऐहोळे यांनी दांडी मारली होती. तर मंत्री गोविंद कारजोळ उमेश कत्ती शशिकला जोल्ले आण्णासाहेब जोल्ले खासदार मंगला अंगडी राज्यसभा सदस्य ईरांना कडाडी भालचंद्र जारकीहोळी अनिल बेनके आनंद मामनी महादेवप्पा यादवाड श्रीमंत पाटील महेश कुमठळी राज्य भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी उपस्थित होते