झाडाला भरधाव क्रुझर आदळून झालेल्या अपघातात
जागीच सात जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ घडली.शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात घडला . क्रूझर मधून प्रवास करणारे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत येत होते.अपघातातील मृत व्यक्ती बेंनकट्टी गावचे आहेत. निगडी गावातील मुलाच्या हळदीला क्रुझर गाडीतून पाहुणे मंडळी गेली होती.अचानक झालेल्या पावसामुळे लग्नाचे ठिकाण बदलण्यात आले होते .मन्सूर गावाकडून बेनकट्टी गावाला परत येत असताना हा अपघात घडला.झाडाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे क्रुझर गाडीचा चेंदामेंदा झाला.अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत यांनी भेट दिली.अपघातातील जखमींना त्वरित धारवाड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे .