एसएससीटी समाजाला 7.5 टक्के आरक्षण देण्यात यावे जर असे न झाल्यास येणाऱ्या काळात बोम्माई सरकार कोसळेल असा इशारा कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण वाढ आंदोलक रिया समितीच्यावतीने आणि विविध दलित वाल्मिकी संघटनांच्यावतीने दिला आहे.
तसेच समाजातील टक्के आरक्षण देण्यात येत आहे हे आरक्षण वाढवून 7.5 टक्के इतके करण्यात यावे या मागणीकरिता अनुसूचित जमाती जमाती आणि वाल्मिकी संघटना च्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.
बेंगलोर येथील फ्रीडम पार्क येथे अनियमित काळासाठी धरणे आंदोलन एससी एसटी समाजाला 7.5 टक्के आरक्षण देण्यात यावे याकरिता सुरू आहे. प्रशांत स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या शंभर दिवसांपासून हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसएसटी समाज आणि विविध दलित वाल्मिकी संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्याला ज्यादा आरक्षण मिळाले पाहिजे यावेळी घोषणाबाजी करून आपले मनोगत व्यक्त केले. आरक्षण मिळणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे ही कोणती विक नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हाक दिला असल्याचे यावेळी सांगितले.
या आंदोलनात सुरेश गव्हान्नावावर महादेव तलवार महेश शिंगीहळ्ळी आनंद शिरूर यांच्यासह कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण आंदोलन किया समिती दलित वाल्मिकी संघटनांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.