सुभाष नगर येथील महानगरपालिकेसमोर पावसाचे पाणी साचून राहिले आहे. ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार असतो अशी परिस्थिती महानगरपालिकेसमोर झाली आहे
कालपासून पडत असलेल्या पावसाने शहरासह इतर भागात पाणी साचले आहे. त्यामुळे महानगरपालिकेसमोर देखील पाणी साचून राहिले आहे.
येथील पाण्याला पुढे जाण्याकरीता वाट नसल्याने गेटच्या समोर आज सर्व पाणी येऊन थांबले आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
तसेच जर येथून चार चाकी वाहन गेल्यास सर्व पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. महानगरपालिकेचे बांधकाम करण्याकरिता योग्य उपाययोजना राबविण्यात न आल्याने सदर परिस्थिती निर्माण झाली आहे.