निपाणी तालुक्यातील मत्तीवडे गावातील मरीआई यात्रेनिमित्त बैलगाडी,घोडागाडी,बैल घोडागाडी आणि घोड्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
दोन वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या विविध शर्यतींना शौकिनांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.शर्यतीसाठी खास मार्ग तयार करण्यात आला होता .बैलगाडी शर्यतीत सोंडगे,कोल्हापूर आणि पाडळी खुर्द गावातील बैलगाड्यानी प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.एक घोडा एक बैल शर्यतीत तेरवाड,म्हाकवे आणि कोगनोळी येथील स्पर्धकांनी क्रमांक पटकावला.घोड्याच्या शर्यतीत कागल,कोगनोळी येथील स्पर्धकांनी बक्षिसे पटकावली. शर्यतीच्या मार्गावर शर्यत पाहण्यासाठी शौकिनानी मोठी गर्दी केली होती.