एपीएमसी मार्केट यार्ड समोर स्मार्ट सिटीचे काम अर्धवट राहिल्याने समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी या गटारीचे बांधकाम करण्यात न आल्याने रस्त्यावरून सांडपाणी वाहते आहे.
तसेच ठिकाणी खड्डे खोदण्यात आल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून राहिले आहे. त्यामुळे या सांडपाण्यावर डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्मार्ट सिटी चे काम हाती घेऊन अर्धवट करण्यात आल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील अर्धवट बांधण्यात आलेल्या गटारी मुळे नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे येथील स्मार्ट सिटीचे अर्धवट ठेवण्यात आलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.