*वॉटर बाऊल प्रकल्प*
मधुकर नलावडे यांच्या नावाने त्यांच्या नातवाने एक फाउंडेशन सुरू केले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पहिला प्रकल्प सुरु केला आहे .या पहिल्या वाहिल्या प्रकल्पाचे नाव म्हणजे वॉटर बाउल प्रकल्प.
या प्रकल्पाद्वारे शहरात हजारो भटक्या प्राण्यांसाठी दर उन्हाळ्यात सुमारे 100 बाऊल पाणी ठेवण्याचे त्यांचे ध्येय आहे.माणसाला जगण्यासाठी जसे स्वच्छ पिण्याचे पाणी आवश्यक आहे तसेच प्राण्यांनाही जगण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आवश्यक आहे
त्यामुळे मुक्या प्राणांचा विचार करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.या वॉटर बाऊल प्रकल्पाला पाठिंबा देऊन या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
यावेळी माजी अध्यक्ष व सदस्य नगर परिषद संकेश्वर अमर नलावडे, व्यापारी प्रताप नलावडे, जिजा मधुकर नलावडे, आर्यन नलावडे, ईशान नलावडे, सुस्मिता राजेश पाटील, अखिलेश नाईक, अभिषेक परुळकर, लिओनेल लोबो, हर्षल कदम आदी उपस्थित होते.