कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही गटारांची स्वच्छता न केल्यामुळे गटारीतून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शास्त्री नगर मराठा कॉलनी एसपी कॉलनी महाद्वार रोड खासबाग आणि वडगाव चा काही भाग पाण्याखाली आहे.
याबाबत ही माहिती समजताच दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दक्षिण भागाची पाहणी करून ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे त्या ठिकाणी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्याची सूचना दिली.
त्यानुसार येथील रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्यास वाट मोकळी करून देण्यात आले यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासमवेत महानगरपालिकेचे समुपदेशक जयंत जाधव नंदू मिरजकर संतोष टोपगी आनंद चव्हाण यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.