विधान परिषद निवडणूक आचारसंहितेत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे त्यानुसार आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व कारण गर्दी होऊ नये यासाठी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला आहे. तसेच त्याच्या अंमलबजावणीला ही प्रारंभ झाला आहे.
न्यायालय आवारात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत या ठिकाणी नागरिक झेरॉक्स महत्त्वाचे कागदपत्रे यासह अनेक गोष्टींची जुळवाजुळव करण्याकरिता गर्दी करत असतात त्यामुळे हा नेहमी गजबजलेला असतो त्याचा फायदा उठवित याठिकाणी काहींनी या ठिकाणी चहाच्या टपऱ्या यासह अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र त्यांच्याकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या चहाच्या टपर्या आणि अन्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
जर न्यायालय आवारातील परवाना नसलेली चहा टपऱ्या अशाप्रकारे पुढेही चालू झाल्यास दुकानदारांवर आणि चहाची टपरी असलेल्या चालकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सर्व टपर्या व दुकाने बंद करण्याचा आदेश बजाविण्यात आला असून सदर विधानपरिषद निवडणूक होईपर्यंत ही आस्थापने बंदच राहणार आहेत.