फक्त न्याय देऊन आणि आरोपीना शिक्षा देऊन गप्प न बसता आरोपी कशाप्रकारे न्यायालयात शिक्षा भोगत आहेत.त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होत आहे का का अन्य कैदी त्यांना त्रास देत आहेत हे पाहण्याकरीता बेळगावातील हिंडलगा तुरुंगाला हायकोर्टाचे न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली.
त्यांनी तुरुंगांना भेटी देऊन पाहणी करण्याची आपली मोहीम हायकोर्ट सुरूच ठेवली आहे. दरम्यान गुरुवारी त्यांनी हिंडलगा मध्यवर्ती तुरुंगाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा न्यायाधीश आणि तुरुंग अधिकारी उपस्थित होते.