*येळ्ळूर गावाची कन्या उत्तर कन्नड जिल्हा, हल्ल्याळ तालुक्यात दहावीत 99.04 टक्के गुण : घवघवीत यश संपादन*
बेळगांव : मिलाग्रिस इंग्रजी माध्यमिक विद्यालय हल्याळ, ता हल्याळ येथील विद्यार्थिनी कु. गौरी रावजी पाटील या विद्यार्थिनी ने 99.04 ट्टके ( गुण – 625 पैकी 619 मार्क ) घेऊन उत्तीर्ण होऊन उत्तर कन्नड जिल्हा तालुका हल्याळ येथे घवघवीत यश मिळविले आहे.
गौरी रावजी पाटील ही येळ्ळूर , तालुका बेळगाव येथील रहिवासी असून अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते रावजी पाटील व भारती पाटील यांची कन्या आहे. प्राचार्या अनुप्रिया मॅडम , प्राचार्य विशाल करंबळकर सर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.