कर्नाटकातील दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे यामध्ये राज्याचा निकाल 85. 73 टक्के लागला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत विजापूरच्या अमित मदार यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
कर्नाटका झालेल्या दहावीच्या परीक्षेला एकूण 8 लाख 53 हजार 436 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एकूण सात लाख 30 हजार 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कर्नाटक राज्यात बेळगाव आणि चिकोडी जिल्हा ग्रेडमध्ये आहे.
तर बाकीच्या जिल्ह्यांनी बी आणि सी ग्रेड मिळविला आहे. दहावीचे झालेल्या परीक्षेत एकूण 3 लाख 58 हजार 602 मुले उत्तीर्ण झाले आहेत. 3 लाख 75 हजार 197 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
2021 22 या शैक्षणिक वर्षात मध्ये देखील मुलींनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. आज राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी ही माहिती दिली आहे