नागरिकांनीही सावध राहा
कपिलेश्वर कॉलनी येथून आज सकाळच्या सुमारास एक्टिवा गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. श्रीकांत देसुरकर राहणार कपलेश्वर कॉलनी यांनी आपल्या घरासमोर आपली एक्टिवा गाडी लावली असता घरासमोरून चोरी झाली आहे. त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात रितसर फिर्याद दिली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत
सदर ॲक्टीव्हा गाडीचा क्रमांक केए 22 ईवाय 44 49 असा असून गाडी चा रंग काळा आहे. तरी आन क्रमांकाची गाडी कोणाला आहे दिसल्यास त्यानी 741 17 97 65 56 किंवा 99 16 60 9987 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे घरासमोर लावलेली दुचाकी चोरी करण्यात पटाईत झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहेत तसेच या बाबत कोणतीही घटना घडल्यास नागरिकांनी त्वरित पोलीस स्थानकाची संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.