एस डी पी आय या मुस्लिम संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश मधील ग्यानव्यापी मशिदी संदर्भात निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेश मध्ये सर्वे केल्यानंतर याठिकाणी मशिदीच्या खाली शिवलिंग सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने सदर मशिद सील बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र न्यायालयाने दिलेला हा आदेश बेकायदेशीर असल्याचे मत एसडीपीआय मुस्लिम संघटनेने व्यक्त केले आहे.
भारतीय घटनेच्या संविधानानुसार पवित्र स्थळांना कोणत्याही ठिकाणी न हलवता त्याच ठिकाणी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.तसेच या पवित्र स्थळांवर कोणत्याही व्यक्तीचा अथवा सरकारचा हक्क नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मात्र असे असताना न्यायालयाने मशिद बंद करण्याचा निर्णय घेतला असून संविधानाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी एस डी पी आय संघटनेने केला.
त्यामुळे पवित्र मुस्लीम धर्मीयांच्या मशिदीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता ते तशाच प्रकारे आबादित ठेवावे अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एसडी पीआय मुस्लिम संघटनेने केली आहे.