संगम हॉटेलमध्ये आज भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा व बेळगाव ग्रामीण जिल्हा व चिक्कोडी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषद निवडणूक पूर्व भावी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या सभेत भाजपच्या मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले विधानपरिषद निवडणुकीपूर्वी आपल्याला प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदानाविषयी जागृती केली पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी आयोजित केलेल्या सभेला अण्णासाहेब जोल्ले शशिकला जोल्ले माजी आमदार संजय पाटील महांतेश कवटगीमठ खासदार मंगला अंगडी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.