खानापूर रोड, उद्यमबाग येथे चुकीच्या मार्गाने अवजड वाहने येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
त्यामुळे आज दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यातील अडथळे दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी या रस्त्यावर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले.
तसेच येथील मार्गावरील अवजड वाहतूक अन्य दुसऱ्या मार्गाने वळविण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल आमदारांनी त्वरित घेतल्याने येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले .