बेळगाव: दिनांक 14 आणि 15 मे रोजी झालेल्या युथ मार्शल आर्ट्स क्लब इंडिया यांच्यावतीने कळसापुर रोड इंदूर स्टेडियम येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय पातळीवर बेळगावच्या जिल्हा स्पोर्टस कराटे असोसिएशन बेळगाव याचे घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत सहाशेहून अधिक क्रीडापटूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत बेळगावातील स्वयम् पाटील प्रज्वल सुठकर सुदर्शन बेळगावकर नवनाथ मोदगे कर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
तर पल्लवी खोम्पि राधिका मल्लवगोळ प्रगती शिंदे प्रज्वल गोंधळी यांनी रौप्य तर समीक्षा लोहार अथर्व पाटील सुमित मालाई समरया बेळवी यांनी कास्यपदक पटकाविले.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक मास्टर लक्ष्मण नाईक सौरभ मालाई स्वयम् कित्तूर श्रुती जोमणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांनी मिळवलेल्या कराटे स्पर्धेतील यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे