बेळगाव संरक्षण दलाच्या अखत्यारीत असलेली सुमारे 754 एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या प्रक्रिये विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव मध्ये याआधीच 140 एकर मध्ये आयटी पार्क उभारण्यात आला आहे. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी देखील जागाही देण्यात आली आहे.असे असताना बेळगाव शहरात पुन्हा आयटी पार्क साठी करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
त्यामुळे हा आयटी पार्क बेळगाव मध्ये न करता सदर जमीन संरक्षण दलाच्या ताब्यात पुन्हा द्यावी अशी मागणी बेळगाव स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बेळगाव मध्ये याआधीच आयटी पार्क साठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा देण्यात आले आहेत मात्र या जागा देऊन देखील बेळगावमध्ये कोणतीही कंपनी येण्यास तयार नाही त्यामुळे पुन्हा बेळगाव मध्ये आयटी पार्क करण्याचा घाट घालू नये
तसेच भारतीय सैन्यात जनाची असलेली गवताळ जमीन भारतीय सैनिकासाठी राखीव ठेवावी. बेळगाव येथील पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारनेही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी गुरुवारी काही प्रमुख वकील व स्थानिक नागरिकांनी श्रीनगर येथील त्या जमिनीची पाहणी केली आणि आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.