रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत काकती मध्ये आज रक्तदान शिबीर पार पडले. सदा रक्तदान शिबिर डीव्हाईन हेल्पिंग हँड्स ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आले होते यावेळी या शिबिराला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जवळपास 100 हून अधिक रक्तदाते रक्तदान करण्याकरिता काकती मध्ये उपस्थित होते. याप्रसंगी बेळगाव येथील संदीप पाटील पांगुळ गल्ली ग्रुप एक्स्ट्रीम जिम सागर कडोलकर ग्रुप व गावातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी रक्तदान करण्यासाठी आलेले रक्तदाते व मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी
ग्रामपंचायत मेंबर्स व हेल्पिंग हँड्स अध्यक्ष गजानन गव्हाणे, सुनिता गव्हाणे, मनोहर शेखर गोळ, प्रवीण रेडेकर, महेश रंगाई ज्योती गवी ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौ वर्षा मुचंडीकर, शिवाजी लोहार, टीपी मेंबर यल्लाप्पा कोळेकर,
शंकर सुळकूडे, लक्ष्मी सोगलद
यांनी मान्यवर रेड क्रॉस स्टाफ व के एल ई हॉस्पिटल स्टाफ व डॉक्टरांचा सत्कार केला.
तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवक विनायक केसरकर, निकिता लोहार, शिवा लोहार, सुधीर पवार, गजानन नाईक, पांडुरंग पवार, इम्रान मुल्ला, संतोष कांबळे, मोहन मजुकर, भावेश सासुलकर, फारूक मंगसुळी, पवन माळदकर, आशिष गव्हाणे यांनी विशेष प्रयत्न केले.