सांबरा शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत
सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेत नव्या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थ्यांला शिक्षकांनी पेन देवून स्वागत केले. पहिलीच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शैक्षणिक वर्षांच्या शुभारंभ होत असल्याने शाळेला तोरण, फुलांच्या माळा आणि केळीच्या झाडांनी सजवण्यात आले होते. मध्यान्ह आहारसोबत गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. बाळेकुंद्री क्लस्टरचे सीआरपी कुरबर सर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महादेव अष्टेकर, उपाध्यक्षा सुमन गिरमल, शिक्षका जी.एम. नाईक, ए. ए. पाटील, टी. व्ही. पाटील, आर. बी. लोहार, शिक्षक व्ही. एस. कंग्राळकर, ए बी. पागाद यांच्यासह पालक उपस्थित होते.