येथील हुबळी तालुक्यातील अदरगुंची गावात तीक्ष्ण हत्याराने भोसकून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेत शंभुलिंग कळमोडी वय 35 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
पूर्ववैमनस्यातून शंभुलिंग याचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मारेकर्यांनी तीक्ष्ण हत्याराने शंभुलिंग याचा खून करून तेथून पलायन केल्याने संशय व्यक्त होत आहे.
शंभुलिंग चा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत हुबळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे.तसेच या प्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.