हलगा मच्छे बायपास विरोधात शेतकरी 2002 पासून कडाडून विरोध करत आहेत. तसेच अनेक आंदोलने देखील शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. मात्र याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे पाहायला मिळाली आहे.
हलगा मच्छे बायपास विरोधात न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील बायपास चे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित सर्वांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली असून लवकरच सर्वांना नोटीस मिळणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
हलगा मच्छे बायपास हा बेकायदेशीर असल्याने शेतकरी त्याला आंदोलने मोर्चा काढून विरोध करत आहेत. तसेच त्याबाबतही न्यायालयाने स्थगिती दिली असतानादेखील पुन्हा हलगा मच्छे बायपास च्या कामाला महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाने सुरुवात करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर कामाला महामंडळ प्राधिकरण आणि प्रशासनाने प्रोसेसिंग स्टे म्हणून काम चालू केले आहे. त्यामुळे हे चुकीचे असून हे संपूर्ण काम त्वरित थांबवावे याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.