*एल्गार परिषद व अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगांव तर्फे याल्लाप्पा पालकर यांचा भावांकुर कविता संग्रह प्रकाशित :*
____________________
खानापूर ,( ता. 13) : कविता या रचाना प्रकारचा विचार करता एका विशिष्ट लयीचा, नाद, ताल, सूर , लय , प्रतिभा , बुद्धीचा भावात्मक आविष्कार कवितेतून पाहायला मिळतो. भावात्मक अर्थाचा प्रत्यय हा रचनाप्रकार देतो असे लक्षात येते. आपल्या जगण्यातील मानवाशी संबंधित असलेल्या निसर्ग, शेती , आपल्या जीवनात आलेल्या वास्तविकतेशी त्यांची कविता वेध घेते; तर प्रेम कविता त्यांच्या जगण्याला जीवनातील अनेक मित्रत्वाच्या बरोबर नातेसंबंध दृढ करते. समाजातील अन्याय, अत्याचार, ढोंगीपणा , लोभी लालसी वृत्ती आणि स्वार्थी पणा बोकाळलेला आहे हा देखील त्यांच्या कवितेतून पाहायला मिळतो. निसर्ग शेती कृषी आणि मानव केंद्रित असलेले जिव्हाळ्याचे संबंध, शिवारात पेरणी मातीशी जोडलेली नाळ अतिशय खुमासदार शैलीत त्यांनी मांडली आहे. शेतामध्ये होणारे शेतकऱ्यांचे कष्ट ग्रामीण जीवनातील असलेला जिव्हाळा ग्रामीण मुलींचा मिश्कीलपणा त्यांच्या भाषाशैलीत ऊन पाहायला मिळतो. अल्पशिक्षित असून देखील अतिशय समाजातील वास्तविकतेची जोड देऊन त्यांनी केलेले लेखन हे एखाद्या प्राध्यापक डॉक्टर किंवा शिक्षकांनाही लाजवेल असे लेखन त्यांच्या कवितेतून पाहायला मिळते. अनेक वांग्मय प्रकार त्यांच्या कवितेतून सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी साहित्यातील अतिशय अशी कलाकृती नकळत त्यांच्या आत्मचिंतन आतून सामाजिक भान आणि जगण्यातील आलेले वास्तविकतेचे दाहक चटके त्यांच्या लेखणीत उतरतात आणि समाजाला प्रबोधनात्मक अशी दिशा देतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षमय अशा वाटचालीतून झाला आहे; याचाच अनुभव त्यांनी त्यांच्या काव्यलेखनात भावांकुर मधून अतिशय काळजाला भिडतील अशा काव्य लेखनाचा अविष्कार सर्वांना प्रेरणा देईल. समाजामध्ये असलेले वेगळेपण विसंगती आणि जगण्यातलं मांडणी त्यांनी केली आहे. रचना धारणा आणि जगणे जीवनातील वेगळेपणा यामधील सगळ्यांना कमी अंतर म्हणजे कविता असून मानवाच्या स्वभाव पासून ते त्यांच्या कल्याणपर्यंत आनंद दुःख विरह अशा विविधतेतून त्यांची कविता जीवनाचा वेध घेत असते. भावांकुर हे अतिशय काळजाला भिडणारे आहे. प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि कवी शिवाजी शिंदे यांनी केले.
एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव आणि समस्त गर्लगुंजी तालुका खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी व विचारवंत ह-भ-प यल्लाप्पा रामचंद्र पालकर लिखित “भावांकुर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि विशेष व्याख्यानाच्या आयोजन श्री कृष्ण बाल विकास संस्कार केंद्र व श्रीकृष्ण मंदिर गर्लगुंजी तालुका खानापूर येथे शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी सकाळी दहा वाजता समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर आणि नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री गोपाळराव मुरारी पाटील उपस्थित होते.
कुणाच्या प्रारंभी सरकारी मराठी शाळा गर्लगुंजी व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर करून सुरुवात केली. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन ग्रा. प. सदस्य अनुराधा नंदकुमार, निटूरकर वंदना, अशोक पाटील, श्याम पाटील पुणे , हनुमंत विठ्ठल मेलगे , यांच्या हस्ते फोटोपूजन ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरेश मारुती मेलगे, एस. एल. पाटील, PKPS चे सदस्य राजू मारूती सिद्धनी यांनी केले.
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार व कवी शिवाजी शिंदे, ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक निवृत्त प्राचार्य वाय.पी. नाईक, कवी प्रा. निलेश शिंदे , संपादक सतीश जाधव , ज्येष्ठ संपादक श्रीकांत काकतीकर यांनी मराठी साहित्य आणि कवितेशी असलेले नाते कविता संग्रह बदल अतिशय मौलिक असे विचार मांडले. भावांकुर लिखित कवी लेखक यल्लाप्पा पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत विनोद पालकर यांनी केले. प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य व्ही. एन. पाटील यांनी केले. परिचय पांडुरंग तुकाराम सावंत व प्रसाद पाटील यांनी करून दिला. गर्लगुंजी आणि परिसरातील अनेक हितचिंतक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन पिराजी गणपत पाखरे आणि परशराम पालकर यांनी केले. मुख्याध्यापक महेश विठ्ठल कुंभार यांनी आभार मानले.
त्यावेळी महेश पालकर , भैरु कुंभार , विनोद कुंभार, रेखा कुंभार, नंदकुमार निटूरकर, वाय. एम. पाटील, अजित पाटील एस. डी. पाटील, आर.डी. पाटील,
यासह परिषदेचे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी, विद्यार्थी , पालक, शिक्षक, प्राध्यापक , कर्मचारी, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक कवी निवृत्त प्राचार्य वाय पी नाईक म्हणाले ; मराठी भाषेची असलेला जिव्हाळा आपला अनुभव याला पालकर यांनी अतिशय सर्वांना भावेल अशा हृदयस्पर्शी कविता लिहून अतिशय मोठे कार्य केले आहे. ग्रामीण भागाशी असलेला आपला संबंध त्यांनी आपल्या बोलीभाषेत ग्रामीण भागातील विविधता त्यांनी मांडली आहे. बेळगाव परिसरात अनेक साहित्यिक होऊन गेले. त्यामध्ये इंदिरा संत कृ.ब. निकुंभ, बाबा पद्मनजी, शंकर रामाणी यांचा जो साहित्याशी असलेला मोठा सिंहाचा वाटा आहे त्याप्रमाणेच यांचेही कार्य त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो. मराठी प्राचीन साहित्य काव्य परंपरा पाहिली तर संत काव्य भक्तीगीते भावगीते लोकगीते यातून परंपरा जोपासली अभंग ओव्या पोवाडे लावणी आरत्या भजने गवळणी भारुड भोंडल्याची गाणी संत काव्य पंत काव्य काव्य पंडिती काव्य छंदोबद्ध काव्य चारोळी चित्रपट गीत संगीत नाट्य कला या सर्वांचा साहित्यात जसा आविष्कार होतो त्याच पद्धतीचा भाव पालकर यांनी सर्वसामान्यांच्या हृदयाला स्पर्श होईल असे त्यांनी लेखन केले आहे आणि त्यांचा आविष्कार त्यांच्या लेखनातून पाहायला मिळतो. आपल्या अवतीभवती चे साहित्य पालकरांनी भावांकुर काव्यसंग्रहात मांडले आहे. जीवनातील वास्तविकतेची जोडलेली नाळ त्यांच्या कवितेतून पाहायला मिळते समाजातील व्यथा-वेदना आणि आनंदही व्यक्त त्यांच्या कवितेतून केलेला आहे.
कवी प्रा निलेश शिंदे म्हणाले; महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आज वेळोवेळी करत आहेत. साहित्यिक विचारवंत लेखक कवी चित्रकार पत्रकार आपल्या वेगवेगळ्या कलेतून साहित्य जतन संवर्धन आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मराठी भाषा मराठी संस्कृती भाषा संवर्धन करण्याचे आपल्या प्रत्येक कर्तव्य असून आपण करणे गरजेचे आहे. कार्य विविध कवितेच्या माध्यमातून याला पालकर यांनी आपल्या भावांकुर या कविता संग्रहातून त्यांनी प्रकट केलेल्या आहेत. ग्रामीण भाषा बोलीभाषा आणि वेगळ्या समाजाशी असलेले जवळचे अनुभव त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडले आहेत. या सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य परिषदेने वेळोवेळी केलेले आहे. बेळगाव सीमाभागातील नवनिर्वाचित दोन मराठी आमदारांनी नुकतीच कर्नाटक विधानसभेत मराठीमधून शपथ घेतली व मराठी अस्मितेचे दर्शन पुन्हा घडवून सार्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात मराठी संस्कृतीचा र्हास होत चालला आहे, असे म्हणताना बेळगाव शहर व परिसरात काय चालले आहे, हे अभ्यासणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीकडे पाहू गेल्यास बेळगावात सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ वाचनालय, छत्रपती शिवाजी वाचनालय ही खूप जुनी वाचनालये आहेत. महाराष्ट्रातील वाचनालयाप्रमाणेच इथल्या मराठी वाचकांची संख्या रोडावत गेली, तरीही अनेक विरोधांना तोंड देत सार्वजनिक वाचनालय, सरस्वती, वाङ्मय चर्चा मंडळ, लोकमान्य ग्रंथालय सरस्वती वाचनालय ही वाचनालये इथली मराठी संस्कृती जपत आहेत. एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे बेळगाव शाखा आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवून मराठी साहित्याची असलेले सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. नवोदित कवी लेखक साहित्यिक यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मोठ्या जिद्दीने आम्ही करत आहोत. प्रत्येक सर्वसामान्यांच्या पर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक कवी साहित्यिक विचारवंत यांची पुस्तके आम्ही प्रकाशित केले आहेत. काही मोजकेच येणारे लोक होते; पण आज बेळगाव शहरामध्ये शंभर एक जवळपास लोक साहित्यिक निर्माण झालेले आहेत हे कार्य या परिषदेने केलेल्या असून गेल्या पंधरा वर्षांपासून ही चळवळ शहरांमध्ये उभी आहे. उपक्रमात बाल कवी पासून 96 वर्षाच्या व्यक्तींच्या पर्यंत सर्व अबाल वृद्ध या परिषदेमध्ये सहभागी आहेत आणि ही चळवळ अतिशय व्यापक स्वरूपामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्रीकांत काकतीकर म्हणाले; मराठी साहित्य आणि कवितेतून मांडलेले विचार हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. वास्तवाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आपल्यातलीच सुखदुःखे निसर्ग शेती विषयक बोलीभाषेत आपल्या हृदयातील अंतःकरणातील भावस्पर्शी अविष्कार कवी यलाप्पा पालकर पालकर यांनी मांडून कवितेत मराठी साहित्यात मोलाची कामगिरी केली आहे. आपल्या परिसरात असलेले जीवन त्यांनी स्वतः पाहिले अनुभवले तेच त्यांनी ग्रामीण भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कविता प्रत्येकाला भावतील व समाजाला प्रबोधन ही करतील. या कवितेतील असलेला आशावाद तो समाजाला दिशा देणारा आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सतीश जाधव म्हणाले ; निसर्गाशी असलेले नाते आपल्या जवळ घडत असणारे घटना त्यांनी जवळून पाहिल्या अनुभवले आणि आपल्या जगण्या-मरण्याचा तील संघर्षमय प्रवासातील अनुभव त्यांच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवीला वेगळी जाणीव त्यांच्या संवेदनशील मनाने अचूक टिपण्याचा प्रयत्न करून आपल्या अंतकरणात आपल्या भावना प्रकट केलेले आहेत. असलेले वेगळेपण समाजातील विसंगती दाखवून त्यावर उपाय म्हणून त्याने खुमासदार शैलीत अतिशय हृदयस्पर्शी कविता लिहून समाजाला एक वेगळा अविष्कार पाहायला मिळतो.
_______________________
फोटो ओळी —
गर्लगुंजी खानापूर : कवी याल्लाप्पा पालकर लिखित “भावांकुर ” कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना गोपाळ पाटील, शिवाजी शिंदे प्रा. निलेश शिंदे, व्ही एन पाटील, सतीश जाधव, श्रीकांत काकतीकर, राजू सिद्दानी, पाडूरांग सावंत, हणमंत मेलगे, एस.एल.पाटील, शाम पाटील, प्रसाद पाटील, सुरेश मेलगे, पिराजी पाखरे आदी.
__________________________
समाप्त