बेळगाव: दुचाकी चोरी करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोर दिवसाढवळ्या दुचाक्या चोरी करत असल्याचे उघडकीस आली आहे.
येथील जेएनएमसी स्विमिंग पूल जवळ सकाळी सव्वा आठच्या सुमारास KA 22 HH 0693 ही दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. तसेच सदर व्यक्तीची छबी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून कोणालाही ही दुचाकी दिसल्यास त्यांनी 9964 288 765 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.