दोन दिवसांपासून शहरात गारठा निर्माण झाल्यामुळे थंडीचे वातावरण पसरले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री थंड वारा सुटल्याने अनेक जण ब्लॅंकेट चादर घेऊन झोपत आहेत.
त्यामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशन च्या संचालिका मीना बेनके यांनी येथील शाहूनगर मधील श्री मलिकाअर्जुन वृद्धाश्रमाला बेडशीट देऊ केले आहेत.
आपल्या घरातील व्यक्तींच्या काळजी प्रमाणे त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांची देखील ब्लॅंकेट देऊन काळजी घेतली आहे. सध्या थंड वातावरण असल्याने तसेच पावसाळ्यातही वृद्धांना बेडशीट ची गरज असल्याने त्यांनी आताच ब्लॅंकेट टॉवेल चे वितरण केले आहे.
मीना बेनके यांनी सदर मदत यांच्या फाउंडेशनच्यावतीने देऊ केली असून वृद्धांना आवश्यक असलेले बेडशीट टॉवेल आणि ब्लॅंकेट त्यांनी फाउंडेशन च्या मार्फत वितरीत केल्या आहेत. यावेळी तालुका च्या संचालिका मीना बेनके मिलन पवार सविता लक्ष्मी यांच्यासह एंजल फाउंडेशनच्या सदस्या उपस्थित होत्या.