शिक्षणाला महत्त्व देत आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी आपल्या जन्मदिनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले.यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील शाळांना शालोपयोगी साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करत एक अभिनव उपक्रम राबविला.
आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचा जन्मदिवस हा 28 मे रोजी आहे परंतु त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या आधीच या उपक्रमाला 12 मे पासून सुरुवात केली असून त्यांनी पहिल्या टप्प्यात तीन शाळांना दप्तर क्रीडा साहित्य व्यायामाचे साहित्य ड्रम सेट यासह अनेक गोष्टी वितरित केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना पाठ्यपुस्तके आणि शाळेत खेळाचे साहित्य वितरित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेत मध्ये जर विविध खेळाच्या वस्तू उपलब्ध असतील तर मुले देखील आवडीने शाळेत येतात आणि रमतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाची देखील आवश्यकता असल्याने त्यांनी क्रीडा साहित्य आणि व्यायामाचे साहित्य वितरित केल्याचे यावेळी सांगितले.
आमदार हेबाळकर यांचा वाढदिवस 28 मे रोजी असला तरी त्यांची विधानसभा निवडणुकीचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला होता यावेळी त्या विजयी झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या आनंदाच्या प्रित्यर्थ त्यांनी दरवर्षी 12 मे रोजी आपल्या राजकीय जीवनासाठी हा दिवस साजरा करत आहेत आणि यापुढेही करत राहतील असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराजहट्टीहोळी यांच्यासह ग्रामीण आणि शहर काँग्रेसचे नेते उपस्थित होते.