केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली यावेळी भेटीप्रसंगी त्यांनी कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
यावेळी ते म्हणाले की कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शहा आपला निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर करणार आहेत. या संदर्भात त्यांनी माझ्याशी भेटी प्रसंगी चर्चा केली असल्याचे यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोकसभा राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मंत्रिमंडळ विस्तार संबंधी चर्चा केली आहे.
राज्यात आगामी निवडणुकांत बाबत बराच काळ वाद सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्नाटकातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच ते म्हणाले की राज्यातील सद्यस्थितीवर आता सर्व काही अवलंबून आहे राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याकारणाने निवडणुकांबरोबर पुढील बदल अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शहा आपला निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असून याची उत्सुकता सर्वांनाच लागली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.