माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे बेळगावचा दोन दिवसीय दौऱ्यावर आले असताना विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांचा नियोजित समारंभ पार पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसमवेत बैठक घेतली.
याप्रसंगी बैठकीत समिती नेत्यांनी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या सुनावणीला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली.
यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सीमावासियांच्या पाठीशी असून सुप्रीम कोर्टात सर्व जनतेने सीमाप्रश्नाच्या खटल्याचा पाठपुरावा करेल असे आश्वासन यावेळी दिले.
तसेच महाराष्ट्र सरकार सीमावाशीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खटल्याचा युक्तिवाद प्रभावीपणे व्हावी यासाठी पावले उचलण्यात येतील
अशी ग्वाही दिली.
यावेळी बैठकीत दीपक दळवी म्हणाले की सीमाप्रश्न समन्वय समितीचे अध्यक्ष एन डी पाटील यांच्या निधनानंतर सीमावासियांच्या पाठपुराव्यासाठी एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी यावेळी बैठकीत केली.
तसेच यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर देखील म्हणाले की कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाच्या खटल्यावर काहीच कामकाज झालेले नाही त्यामुळे या खटल्यावर बारकाईने लक्ष देऊन हा प्रश्न त्वरित सोडविण्याचे सांगितले.
या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी माजी आमदार मनोहर किणेकर राजाभाऊ पाटील प्रकाश मरगाळे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आर आर पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.