मुडलगी तालुक्यात सत्तीगेरी शिवारात एका मशिदीवर अज्ञात युवकांनी भगवा ध्वज फडकवण्याची खळबळजनक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी आज पहाटे साडेतीन ते सव्वा पाचच्या सुमारास मशिदीवर भगवा ध्वज फडकवला.
दरम्यान मुस्लीम धर्मीय सकाळी मशिदीकडे नमाज पठाण करण्याच्या वेळेस सदर भगवा ध्वज मशिदीवर पाहला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी सत्यगेरी मड्डी शिवारात पसरली.
कर्नाटकामध्ये दोन धर्मांमध्ये संघर्ष सुरूच असताना ही खळबळजनक घटना घडली आहे. मात्र येथील मुस्लीम धर्मियांनी हिंदू धर्मियांच्या ज्येष्ठांशी चर्चा करून मशिदी वरील भगवा ध्वज हटविला आहे.
सदर घटना अरभावी गावच्या उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या 645 लोकांच्या वस्तीत घडली आहे. मात्र हा ध्वज कोणी आणि कशासाठी लावला याबाबत आता कोणती माहिती मिळाली नसून पोलीसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे .